news
clock
डेअरी फार्म उड्डाणपूलाला अजितदादांचे नाव द्यावे, नगरसेवक डब्बू आसवानी यांची मागणी

डेअरी फार्म उड्डाणपूलाला अजितदादांचे नाव द्यावे, नगरसेवक डब्बू आसवानी यांची मागणी

डेअरी फार्म उड्डाणपूलाला अजितदादांचे नाव द्यावे, नगरसेवक डब्बू आसवानी यांची मागणी 

पिंपरी, ता. ३ - पिंपरी येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या डेअरी फार्म उड्डाणपूलाला 'दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उड्डाणपूल’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांनी प्रभाग क्र. २१ मधील सर्व नगरसेवकांच्या व नागरीकांच्या वतीने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.

या निवेदनात आसवानी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार असलेल्या अजितदादांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीपूर्ण व मोलाचे योगदान दिले.  पाणीपुरवठा योजना, रस्ते व वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विकास, नागरी पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था तसेच महापालिकेची आर्थिक शिस्त व बळकटीकरण यांसाठी त्यांनी घेतलेले निर्णय शहराच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरले. त्यामुळे त्यांच्या प्रेरणादायी कार्याची सतत आठवण राहावी म्हणून पिंपरी येथील नवीन डेअरी फार्म उड्डाणपुलाला 'दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उड्डाणपूल’ असे नाव देण्यात यावे. 

सदर प्रस्तावाची दखल घेऊन तो मान्य करावा व संबंधित विभागास तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी डब्बू आसवानी यांनी म्हटले आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories