news
clock
तरुणांच्या टोळक्याची कुत्र्यांना क्रूरपणे मारहाण, संत तुकारामनगरमधील घटना

तरुणांच्या टोळक्याची कुत्र्यांना क्रूरपणे मारहाण, संत तुकारामनगरमधील घटना

तरुणांच्या टोळक्याची कुत्र्यांना क्रूरपणे मारहाण, संत तुकारामनगरमधील घटना 

पिंपरी, ता. २ - तरुणांच्या टोळक्याने रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना क्रूरपणे मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. २८)  संत तुकारामनगर परिसरात घडली आहे. आरोपी तरुणांवर रविवारी (ता. १) संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत, स्थानिक रहिवासी प्रज्वल कमलेश दुबे (वय ३२, व्यवसाय वकिल) यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी स्वप्नील सखाराम सावंत आणि काही तरुणांनी  कुत्र्यांना मारहाण करत एका कुत्र्याला हातात धरुन हवेत गोल फिरवले आणि जमिनीवर जोरात आपटून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी नाचत आणि आरडा-ओरडा करत चारचाकी गाडी भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्याकडेने उभ्या असलेल्या कुत्र्यांना उडवण्याचा प्रयत्न केला.

संत तुकारामनगर पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता २०२३ कलम ३२५ व प्राण्यांना क्रूर वागण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१)(ऐ) आणि भादवी कलम ४१९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अटक नाहीत. पोलीस चौकशी करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories