news
clock
'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह' प्रकरणात एकावर दंडात्मक कारवाई

'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह' प्रकरणात एकावर दंडात्मक कारवाई

 'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह' प्रकरणात एकावर दंडात्मक कारवाई 

पिंपरी, ता. २ - पिंपरी-चिंचवड पोलीसांनी २५ जानेवारी २०२५ रोजी 'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह' कारवाई केली. या कारवाईत योगेश देवीदास माळी  (वय २८ वर्षे, रा. विठ्ठल मंदीरा जवळ, हिंजवडी गावठाण) हा मद्यपान करुन मोटारसायकल चालवत होता. त्याच्यावर, हिंजवडी वाहतुक विभाग येथे मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली होती व शिवाजीनगर मोटार वाहन न्यायालयात  खटला सुरु होता. 

सोमवारी (ता. २) मोटार वाहन न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेऊन आरोपी योगेश माळी याला मोटार वाहन कायद्यान्वये दोषी धरण्यात आले. वैद्यकीय चाचणीचा नमुना पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात आला.  आरोपीस शिवाजीनगर, मोटार वाहन न्यायालय, न्यायदंडाधिकारी वर्ग - १ यांनी खालील प्रमाणे शिक्षा दिलेली आहे.

- १) मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे १५ दिवस साधा कारावास व रुपये १०,०००/- दंडाची शिक्षा व       दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावास

- २) मोटार वाहन कायदा कलम १३० (१)/१७७ प्रमाणे ५००/- रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास १       दिवस साधा कारावास

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories