पुणे-पिंपरीतील पर्यटक दुबईत अडकले, इराण आणि इस्राईलमधील युद्धाचे पडसाद
Mar 02 2026
27
पुणे-पिंपरीतील पर्यटक दुबईत अडकले, इराण आणि इस्राईलमधील युद्धाचे पडसाद
पुणे, ता. २ - इराण आणि इस्राईल यांच्यात सुरु झालेल्या युद्धामुळे मध्यपूर्व देशांमध्ये निर्माण झाला आहे. परतीची व्यावसायिक उड्डाणे रद्द झाल्याने अनेक पर्यटक दुबईत अडकून पडले आहेत. 'कॅप्टन इंडिया टुर्सच्या माध्यमातून ४० पर्यटकांचा एक गट २५ तारखेला रात्रीच्या विमानाने दुबईला गेला होता. हा संपूर्ण गट सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकून पडला आहे. दुबईत अडकलेल्या या ४० जणांच्या गटामध्ये सुमारे ३० पर्यटक हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील आहेत.
अडकलेल्या पर्यटकांनी सांगितले की, ''आम्ही भारतीय दूतावासशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने विशेष विमाने पाठवून आमची मायदेशात आणण्याची व्यवस्था करावी आणि वाढत्या खर्चातून दिलासा द्यावा.'' 'कॅप्टन इंडिया टुर्सच्या माध्यमातून ४० पर्यटकांचा एक गट २५ तारखेला रात्रीच्या विमानाने दुबईला गेला होता. २६ तारखेपासून त्यांची सहल सुरळीत सुरू होती. मात्र, अचानक युद्ध भडकल्याने आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरु झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या पर्यटकांचे २ तारखेला रात्री साडेदहाचे परतीचे उड्डाण होते. मात्र, हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने ते रद्द करण्यात आले. त्यामुळे हे पर्यटक सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकून पडला आहे.
दुबईत अडकलेल्या या ४० जणांच्या गटामध्ये सुमारे ३० पर्यटक हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील आहेत. यामध्ये प्राधिकरण, देहूरोड, सांगवी, जुनी सांगवी, नन्हे आणि आंबेगाव परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. या गटामध्ये पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका सुमन नेटके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षा उषा नेटके यांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त नाशिक, मुंबई आणि दिल्लीतील काही पर्यटकांचा या गटात समावेश आहे.
''सर्व जण सुखरूप आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या संपर्कात आहोत.'', असे पिंपरी-चिंचवडच्या किवळे विकासनगर येथील माजी नगरसेविका सुमन नेटके यांचे चिरंजीव राहुल नेटके यांनी सांगितले.