दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, देहूरोड पोलिसांची कामगिरी 

४ बाईक व १ रिक्षा जप्त, ६ गुन्हे उघडकीस

पिंपरी, ता. ३ - दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीला दहूरोड पोलिसांनी पकडले आहे. आरोपींकडून एकूण ५ लाख रुपयांच्या ६ मोटार सायकली व १ ऑटो रिक्षा जप्त केल्या असून एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार परिमंडळ - ४ च्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलिसांनी दोन विशेष तपास पथके तयार केली. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढवली. त्यानुसार २७ जानेवारीला एक पथक देहूगांव परिसरात पेट्रोलिंग करत असताना, एक इसम विनानंबरप्लेटची मोटार सायकल घेऊन परंडवाल चौकाकडून पेट्रोल पंपाकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तपास पथकाने ईश्वर संदीप गजे (वय २२ वर्षे, सध्या रा. खालुब्रे) याला नैतिक पेट्रोलपंपाच्या थोडे पुढे जाऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडील बिगरनंबर प्लेट मोटारसायकलचा तपास केल्यावर त्याने ही मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. 

याच आरोपीकडे, अधिक चौकशी करताना त्याने अनिकेत उर्फ छोट्या संतोष विटकर (वय २० वर्षे, रा. देहूगांव), आर्यन उर्फ एस.पी. आनंदा राऊत (वय १९ वर्षे, रा. मोशी) हे देखील मोटार सायकल चोरीचे गुन्हे करतात अशी माहिती दिल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. अनिकेत व आर्यन या आरोपींकडून ४ मोटार सायकली व १ ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे. 

एकूण, तीन आरोपींकडुन एकूण ५,००,०००/- रुपये किंमतीच्या ६ मोटारसायकली व १ ऑटो जप्त केली आहे व एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

उघडकीस आलले गुन्हे .....

१) देहूरोड पो.स्टे. गु.रजि.नं. २२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)

२) देहूरोड पो.स्टे. गु.रजि. नं. २४/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२)

३) दिघी पो.स्टे. गु.र.नं. ६२२/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२),

४) दिघी पो.स्टे. अदखलपात्र गु.र.नं. १२०/२०२६ बी.एन.एस. कलम ३०३(२)

५) सिंहगड रोड पोलीस ठाणे गु.र.नं.३०/२०२६ बी.एन.एस. कलम ३०३ (२),

६) खडक पोस्टे गु.र.नं. २९/२६ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त श्री शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे  सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री. कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे, पोलीस अंमलदार किरण खेडकर, बाळासाहेब विधाते, सुरेश ढवळे, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, युवराज माने, शुभम बावनकर, अमोल माने, मोमीन शेख यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance