news
clock
पिंपरी-चिंचवड महापालिकेने करदात्यांसाठी “अभय योजना” राबवावी, नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने करदात्यांसाठी “अभय योजना” राबवावी, नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने करदात्यांसाठी “अभय योजना” राबवावी, नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

पिंपरी, ता. ३ - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत करदात्यांसाठी “अभय योजना” राबविण्यात यावी. यामध्ये प्रलंबित करावरील दंड व व्याजामध्ये सवलत अथवा माफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाघेरे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत आतापर्यंत सुमारे ६९० कोटी रुपयांहून अधिक करवसुली करण्यात आली असून ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, कोरोना काळातील आर्थिक अडचणी, रोजगारावर झालेले परिणाम तसेच इतर कारणांमुळे अनेक नागरिक वेळेत करभरणा करु शकले नाहीत. परिणामी, त्यांच्यावर विलंब शुल्क व दंडाचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या “अभय योजने”प्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही अभय योजना राबवावी. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर थकीत कराची वसुली जलद गतीने होईल व नागरिकांनाही दिलासा मिळेल. 

येत्या दोन महिन्यांत सुमारे ९०० ते १००० कोटी रुपयांपर्यंत कर संकलन होण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्यासह नागरिकहित लक्षात घेऊन अभय योजना तातडीने लागू करावी, आयुक्तांनी या प्रस्तावाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून संबधित विभागास अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत, असे वाघेरे यांनी म्हटले आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories