पैशांचे आमिष दाखवून महिलेला वेश्याव्यवसायास बळी पाडणाऱ्या इसमाला अटक, किवळे येथील लॉजमध्ये कारवाई
पैशांचे आमिष दाखवून महिलेला वेश्याव्यवसायास बळी पाडणाऱ्या इसमाला अटक, किवळे येथील लॉजमध्ये कारवाई
पिंपरी, ता. २९ - पैशांचे आमिष दाखवून महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या इसमाला अटक करुन अनेतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेची पोलिसांनी सुटका केली. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने ही कारवाई देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत किवळे येथील हॉटेल स्काय इन लॉजमध्ये बुधवारी (ता. २७) केली.
याबाबत, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे अधिकारी सुनिल शिरसाट यांनी फिर्याद नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी
प्रेम विश्राम जैसवाल (वय ५० वर्षे, रा. मुकाई चोक, किवळे) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलेस पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होता. त्याच्याकडे एकूण ८,५३०/- किंमतीचा मुद्देमाल सापडला. आरोपी मूळचा मध्यप्रदेशातील आहे. पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले व पिडीत महिलेची सुटका केली.
आरोपीवर देहूरोड पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २८) भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३ (२) सह अनेतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.