भरधाव टेम्पोची कारला जोरदार धडक; ७८ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

भरधाव टेम्पोची कारला जोरदार धडक; ७८ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

चाकण | २९ ऑगस्ट २०२६ : शिक्रापूर-चाकण मार्गावर भरधाव टेम्पोने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ७८ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. २८) पहाटे पावणेचारच्या सुमारास साबळेवाडी गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ घडला.

अपघातात तात्यासाहेब बाबुराव पवार (वय ७८, रा. चऱ्होली, आळंदी, ता. खेड) यांचा मृत्यू झाला. कारचालक सरज सिंग गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक प्रथमेश काळूराम मोहिते (वय २१, रा. मोहितेवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीवरून टेम्पोचालक अकील फारुख शेख (वय २६, रा. बडनापूर खुर्द, पोस्ट गेवराई, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार क्रमांक एमएच ४३ एटी ३८७४ शिक्रापूरकडून चाकणच्या दिशेने येत होती. त्यावेळी आरोपीने टेम्पो क्रमांक एमएच १७ एजी ७९५७ भरधाव वेगाने चालवत कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या वेळी टेम्पोने कारला जोरदार धडक दिली.

अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला, तर तात्यासाहेब पवार यांच्या हातांना आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दारूच्या नशेत आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पो चालवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories