news
clock
भारतीय सैन्याच्या 'अग्निवीर' भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

भारतीय सैन्याच्या 'अग्निवीर' भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

भारतीय सैन्याच्या 'अग्निवीर' भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

पिंपरी, ता. २१ - भारतीय सैन्याच्या 'अग्निपथ' योजनेअंतर्गत 'अग्निवीर' (पुरुष) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये, अविवाहित पुरुष उमेदवारांना १ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सैन्य भरती पुणे मुख्यालयाकडून देण्यात आली.

पुणे सैन्य भरती कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी ही भरती आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांतील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांना अर्ज करता येईल. त्यासाठी, ऑनलाइन नोंदणी सुरु झाली आहे. 

या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) जून २०२६ मध्ये होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. उमेदवारांनी अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन सैन्य भरती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories