भक्ती-शक्ती उड्डाणपुलाला पावसाच्या पाण्यामुळे मोठे भगदाड

भक्ती-शक्ती उड्डाणपुलाला पावसाच्या पाण्यामुळे मोठे भगदाड

भक्ती-शक्ती उड्डाणपुलाला पावसाच्या पाण्यामुळे मोठे भगदाड

पिंपरी, ता. १० जुलै २०२६ - निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाला पावसाच्या पाण्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.

अपघाताचा धोका टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने या गोष्टीची गांभिर्याने दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करावी. भक्ती-शक्ती उड्डाणपूल, महात्मा बसवेश्वर पुतळा ते अंकुश चौक निगडी ग्रेड सेपरेटर रस्ता बंद करावा, असे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.   

भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे बांधकाम बी. जी. शिर्के कंपनीद्वारे सन २०१८ ते २०२० कालावधीमध्ये झाले आहे. त्यासाठी  १४५ कोटी रुपये खर्च पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने  केला आहे. कंत्राटदार कंपनीला भक्ती-शक्ती उड्डाणपूल बांधकाम करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. या कामासाठी सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, कंपनीने भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले. ह्या पूर्वीही भक्ती-शक्ती उड्डाणपुलाला भगदाड पडले होते. त्यावेळीही पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला सदर कंपनी विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली होती. 

 दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्यावेळी उड्डाणपुलावरील गोलाकार भागात पावसाच्या पाण्यामुळे भगदाड पडले. हे धोकादायक आहे. त्यामुळे, ठेकेदार कंपनीकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १४५ कोटी रुपये खर्च वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे नागरिकांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories