news
clock
महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची निवड

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची निवड

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची निवड 

पिंपरी, ता. ४ - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांची महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या रुपाने महापालिकेला खंबीर विरोधी पक्षनेता मिळाला आहे.

भाऊसाहेब भोईर हे राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते आहेत. या महापालिका निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक १७ मधून विजयी झाले आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी भोईर यांच्या नावाची चर्चाही होती. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आपण विरोधी पक्षनेतेपदासाठी ज्येष्ठत्वानुसार भाऊसाहेबांचे नाव सुचवल्याचेही सांगितले होते. दुसरे ज्येष्ठ नेते योगेश बहल यांच्याकडे पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे भाऊसाहेब भोईर हेच विरोधीपक्षनेता पदासाठी योग्य ठरले.  

शहरातील राजकीय क्षेत्रात भोईर यांचे वजन आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व भाऊसाहेब भोईर युवा मंचाच्या माध्यमातून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातही भोईर यांचा दांडगा वावर आहे. त्यामुळे त्यांच्या प्रभावी संघटन कौशल्याने शहरात राष्ट्रवादीचे संघटन अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा आहे.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल भोईर यांचे राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories