वाकडमध्ये स्पा-सेंटरवर छापा,  चार महिलांची सुटका

वाकडमध्ये स्पा-सेंटरवर छापा, चार महिलांची सुटका

वाकडमध्ये स्पा-सेंटरवर छापा,  चार महिलांची सुटका

पिंपरी, ता. ४ - वाकड परिरात स्पा-सेंटरवर छापा टाकून  पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सोमवारी (ता. २) तेथील चार पिडीत महिलांची सुटका केली आहे. 

‘इटर्नल फॅमिली स्पा’ सेंटरवर छापा टाकला असून सेंटरचा व्यवस्थापक अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम (वय ३२, रा. विशालनगर, पिंपळे निलख) याला पोलिसांनी अटक केली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिटा कायदा कलम १८ (१) (अ) अंतर्गत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘निक्की लॉज’, काळेवाडी पोलिस ठाणे हद्दीतील ‘लेमन ग्रास थाई स्पा’ आणि सांगवी हद्दीतील ‘औरा थाई स्पा’ ही तीन स्पा सेंटर्स  एक वर्षासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सदर कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते, सहायक निरीक्षक वैशाली शेंडगे यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories