news
clock
महाशिवरात्रीच्या कालावधीत श्री क्षेत्र भीमाशंकर बंद राहणार, भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन

महाशिवरात्रीच्या कालावधीत श्री क्षेत्र भीमाशंकर बंद राहणार, भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन

महाशिवरात्रीच्या कालावधीत श्री क्षेत्र भीमाशंकर बंद राहणार, भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन 

पिंपरी, ता. ९ - नाशिकमध्ये सन २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या कालावधीत लाखो लोक श्री क्षेत्र भीमाशंकरला भेट देऊ शकतात. त्यामुळे भीमाशंकरमधील विविध विकासकामे पूर्णत्वास न्यायची आहेत. त्यामुळे या वर्षी १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्रीच्या कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या दररोजच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. 

सर्व भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखड्याला मंजुरी दिलेली आहे. या विकास आराखड्याअंतर्गत भाविकांसाठी विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये, नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

विकासकामांच्या अंमलबजावणीदरम्यान बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड व अन्य यंत्रसामग्री मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. भाविकांची सुरक्षितता राखण्यासाठी तसेच विकास आराखड्यातील कामे नियोजित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी यापूर्वी मंदिर तीन महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र, भाविकांच्या सुरक्षितेसाठी महाशिवरात्रीच्या काळातही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories