news
clock
बारावी-दहावीच्या परीक्षार्थींसाठी 'पीएमपी'ची विशेष सुविधा

बारावी-दहावीच्या परीक्षार्थींसाठी 'पीएमपी'ची विशेष सुविधा

बारावी-दहावीच्या परीक्षार्थींसाठी 'पीएमपी'ची विशेष सुविधा

पिंपरी, ता. १० - बारावीची परीक्षा आजपासून (ता. १०) सुरु झाल्या आहेत आणि दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी 'पीएमपीएमएल'ने खास बस सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. 

यामध्ये, १) परीक्षा कालावधीमध्ये बसपासधारक विद्याथ्यांचे बसपास त्यांच्या राहत्या ठिकाणापासून आणि परीक्षा केंद्रापर्यंत दरम्यान वैध मानण्यात येतील. सदर विद्यार्थ्यांना वेगळे प्रवासी तिकीट घ्यावे लागणार नाही, २) परीक्षा कालावधीमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजातून प्रवेशाची मुभा राहील, ३) परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बससेवा उपलब्ध व्हावी याकरीता गर्दीच्या बसथांब्यांवर अधिकारी /पर्यवेक्षकीय सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच शालेय व्यवस्थापनाकडून सूचना आल्यास अतिरिक्त बसेसचे देखील नियोजन करण्यात येणार आहे.

बारावी व दहावीच्या सर्व परीक्षार्थींनी व त्यांच्या पालकांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या बस प्रवासाच्या सुविधाचा लाभ घ्यावा,असे आवाहन पीएमपी व्यवस्थापनाने केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories