news
clock
महिला दिनानिमित्त पुण्यात पर्यटनाचा मनसोक्त आनंद घ्या....

महिला दिनानिमित्त पुण्यात पर्यटनाचा मनसोक्त आनंद घ्या....

महिला दिनानिमित्त पुण्यात पर्यटनाचा मनसोक्त आनंद घ्या....

'पीएमपीएमएल'कडून ८ मार्चला ८ प्रसिद्ध पर्यटन बसमार्गांवर विशेष सेवा

पिंपरी, ता. ५ -  जागतिक महिला दिनानिमित्त....अर्थात ८ मार्चला, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पर्यटनाची आनंददायी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्वारगेट मुख्य बसस्थानकावरून ८ प्रसिद्ध पर्यटन बसमार्गांवर विशेष ८ वातानुकूलित ई-बसेस सोडण्यात येणार आहेत. यंदा जागतिक महिला दिन रविवारी आला असल्याने पीएमपीच्या योजनेद्वारे भगिनींना सहकुटुंब तसेच मैत्रिणींना एकत्रितपणे पुण्यात पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

वातानुकूलित ई-बसेसद्वारे एकूण १३ पर्यटन बससेवा मार्ग सुरु करण्यात आलेले आहेत. या पर्यटन बससेवेला हौशी पर्यटक व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवाशांच्या नोंदणीनुसार बसेस सोडण्यात येतात. महिला दिनानिमित्त पीएमपीने आयोजिलेल्या योजनेमध्ये  स्वारगेट मुख्य बसस्थानकावरून ८ प्रसिद्ध पर्यटन बसमार्गांवर विशेष ८ वातानुकूलित ई-बसेस सोडण्यात येणार आहेत. या पर्यटन बससेवेअंतर्गत प्रति व्यक्ती फक्त ५००/- रुपये या परवडणाऱ्या तिकिट दरामध्ये पुणे परिसरातील विविध धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांची सफर करता येणार आहे.

महिला दिनानिमित्त भगिनींनी कुटुंबासह, मित्रपरिवारासह या विशेष पर्यटन बससेवेचा लाभ घेऊन रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

पर्यटन बससेवेचे बुकिंग पुढील पास केंद्रांवर करता येईल - १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) मनपा भवन, ५) कात्रज, ६) हडपसर गाडीतळ, ७) भोसरी बसस्थानक, ८) निगडी बसस्थानक

पर्यटन बससेवेबाबत अधिक माहितीसाठी पर्यटन बससेवेचे समन्वयक नितीन गुरव (मो. ९८५०५०१८६२) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories