news
clock
मालमत्ता कर आता साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार

मालमत्ता कर आता साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार

मालमत्ता कर आता साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार 

पिंपरी, ता. ३ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरु आहे. नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवली जाणार आहेत. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर वेळेत भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने सांगितले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांसाठी कर भरण्यासाठी १८ विभागीय कर संकलन कार्यालये कार्यान्वित आहेत. या ठिकाणी तसेच ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरु असून, थकबाकीदारांवर मालमत्तांची जप्ती करणे तसेच नळ कनेक्शन खंडित करणे अशी कारवाई केली जात आहेत. आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी तसेच चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर वेळेत भरावा. 

आवाहन....

कर भरा, शहरविकासात हातभार लावा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाच्या वतीने विविध माध्यमांतून नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांसाठी ऑनलाईन कर भरणा करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील करदात्यांनी मालमत्ता कराचा भरणा करून शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा.

- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

कर भरण्याची वेळ वाढवली 

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार आणि रविवार या कालावधीत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांतील कॅश काऊंटर सुरू असणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्याची वेळ वाढविण्यात आली असून, दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

- सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

---------------------------------------------------------------------------



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories