news
clock
रवी लांडगे यांची 'पिंपरी-चिंचवड'च्या महापौरपदासाठी निश्चिती

रवी लांडगे यांची 'पिंपरी-चिंचवड'च्या महापौरपदासाठी निश्चिती

रवी लांडगे यांची 'पिंपरी-चिंचवड'च्या महापौरपदासाठी निश्चिती 

 उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर निश्चित, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे शहराध्यक्षांना पत्र

पिंपरी, ता. २ - संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर पदासाठी प्रभाग क्रमांक ६ मधून बिनविरोध निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक रवी लांडगे व उपमहापौरपदासाठी आणि प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेल्या शर्मिला बाबर यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. 

याबाबतचे पत्र, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पाठवले आहे. सोमवारी महापालिकेमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये महापौर व उपमहापौर पदाच्या नावांची निश्चिती झाल्याची घोषणा करण्यात आली.  

दिवंगत नेते अंकुशराव लांडगे यांचे पुतणे अशी ओळख असलेले रवी लांडगे हे भोसरीतील-धावडे वस्तीमधील शिवसेना उबाठा गटाचे नेते होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रवी यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात भाजपात जाहीर प्रवेश केला होता. गेल्या आणि या निवडणुकीतही ते बिनविरोध निवडून आले. आता भाजपने महापौर पदासाठी त्यांचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळे महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या अन्य नावांच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories