राज्यातील सर्व एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांना १ जून २०२६ पासून विनाशुल्क वापरता येणार

राज्यातील सर्व एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांना १ जून २०२६ पासून विनाशुल्क वापरता येणार

राज्यातील सर्व एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांना १ जून २०२६ पासून विनाशुल्क वापरता येणार 

पुणे, ता.  १५ -  महाराष्ट्रातील सर्व एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांना १ जून २०२६ पासून विनाशुल्क वापरता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC)ही घोषणा केली आहे. प्रमुख स्थानकांवर पाणपोई उभारली जाणार आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये व  बसस्थानकांवर स्वच्छता राखली जावी, यासाठी स्वच्छतागृहे मोफत वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळ एसटी स्थानकांवरील सर्व स्वच्छतागृहे कंत्राटदाराकडून स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. सर्व स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची व  देखभालीची जबाबदारीही महामंडळ घेणार आहे. यापुढेही स्थानकांवरील स्वच्छतागृहे उत्तम स्थितीत राहातील यावर भर दिला जाणार आहे.  

बसस्थानकांवरील अस्वच्छतेबाबत प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येत होत्या, त्यावर उपाययोजना म्हणून मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.या निर्णयामुळे प्रवाशांना एसटी प्रवास अधिक सुलभ आणि स्वच्छ होणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories