राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांचा बैलगाडीतून महापालिकेत प्रवेश

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांचा बैलगाडीतून महापालिकेत प्रवेश

 राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांचा बैलगाडीतून महापालिकेत प्रवेश  

पिंपरी, ता. १५ - पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानुसार, शुक्रवारी (ता. १५) महापौर व आयुक्त सायकलवरुन महापालिकेत आले. काही नगरसेवक इलेक्ट्रीक गाडीने महापालिकेत आले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे,  स्वाती काटे, प्रतीक्षा जवळकर यांनी बैलगाडीतून महापालिकेत प्रवेश केला. 

नगरसेवक राजू बनसोडे म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीच्या आदेशाचे पालन करत आम्ही इंधन बचतीसाठी बैलगाडीतून महापालिकेत आलो आहोत. या पुढील काळातही आम्ही इंधन बचतीचा प्रयत्न करु.'' याचवेळी  राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी यावेळी भाजपवर टीकाही केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकप्रतिनिधींना काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्याच्या नेमकं उलट चित्र दिसत आहे. आर्थिक परिस्थिती डळमळीत असल्याचे सांगितले जाते, पण दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये, परदेश दौरे आणि अनावश्यक खर्च सुरूच आहेत,” असा आरोप केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या कारभारावर ‘दिखाऊ विकास’ आणि ‘प्रसिद्धीचा हव्यास’अशी टीका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली. “बैलगाडीतून येणे ही केवळ प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी नसून सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध आहे. असे त्यांनी सांगितले. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories