news
clock
राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत प्रगती गायकवाडला सुवर्णपदक

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत प्रगती गायकवाडला सुवर्णपदक

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत प्रगती गायकवाडला सुवर्णपदक

पिंपरी, ता. ३ - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (२० वर्षांखालील  महिला) १ फेब्रुवारीला सांगली येथील वसंतदादा कुस्ती केंद्र येथे पार पडली. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडू पैलवान प्रगती विनोद गायकवाड हिने ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. प्रगतीने सर्व लढती एकतर्फी जिंकल्या. 

या उल्लेखनीय यशाबद्दल  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने प्रगतीचा सन्मान करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, संतोष माचुत्रे, विशाल कलाटे, विजय गावडे, ज्ञानेश्वर कुटे यांच्यासह पंडित मोकाशी, रतन लांडगे, राजाराम कुदळे, जयराम नाणेकर, दिलीप काळे, संजय हजारे, काळुराम कवितके, हेमंत फुगे यांनी प्रगतीचे अभिनंदन केले. 

--------------------------------------------------------------------------------------------




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories