व्हिडिओ कॉलच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे 1.50 लाखांचे दागिने लंपास

व्हिडिओ कॉलच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे 1.50 लाखांचे दागिने लंपास

चाकण | 31 ऑगस्ट 2026 : वडिलांना व्हिडिओ कॉल करून सोनसाखळी आणि अंगठी दाखवायची असल्याचे सांगत अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याचा प्रकार चाकणमध्ये घडला.

याबाबत गोविंद धर्मराज दर्वेशवार वय 79 रा.भाम यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 ते 10:15 वाजण्याच्या दरम्यान पुणे-नाशिक मार्गावरील सक्सेस पॉइंट आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्सच्या मधील वॉशिंग सेंटरजवळ घडली. 

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी सुंबरेनगर ते पाय स्कूलसमोरील मार्गावर फिरत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांना आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर तो फिर्यादीला पुणे-नाशिक मार्गावरील वॉशिंग सेंटरजवळ घेऊन गेला. आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील अंगठी त्यांच्या वडिलांना व्हिडिओ कॉलवर दाखवायची असल्याचे सांगितले. आपल्यालाही तशीच सोनसाखळी आणि अंगठी बनवायची आहे, असा बहाणा करून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दागिने हातात घेऊन हातचलाखीने ते लंपास केले आणि घटनास्थळावरून निघून गेला.

चोरी झालेल्या दागिन्यांची एकूण किंमत 1 लाख 50 हजार रुपये आहे. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 744/2026 नोंदवण्यात आला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories