news
clock
शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी उद्या महापालिकेमध्ये समन्वय बैठक

शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी उद्या महापालिकेमध्ये समन्वय बैठक

शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी उद्या महापालिकेमध्ये समन्वय बैठक 

पिंपरी, ता. ३ - पिंपरी-चिंचवड शहरात प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व आयोजित करण्यात येते. त्यासाठीची समन्वय बैठक बुधवारी (ता. ४) दुपारी ३ वाजता महापालिका भवनातील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानी विक्रांत बगाडे असतील. शहरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळे, विविध शैक्षणिक व इतर संस्था,  ट्रस्ट, कामगार संघटना, पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये शिवजयंती प्रबोधन पर्व साजरे करण्याबाबत विचार विनिमय होईल. त्यानुसार कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. 

सर्वांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories