news
clock
श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवानिमित्त जुनी सांगवीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह

श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवानिमित्त जुनी सांगवीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह

श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवानिमित्त जुनी सांगवीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह 

पिंपरी, ता. २ - शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकटदिनानिमित्त जुनी सांगवीतील गजानन महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन २ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे ५ ते ६ या वेळेत काकड आरती होईल. यंदा 'श्रीं'चा २१ वा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन साजरा होणार आहे. 

सोहळ्यात दररोज रात्री ८ ते १० या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने रंगणार आहेत. यामध्ये सचिनदादा महाराज पवार, ह.भ.प. पंढरीनाथ महाराज वाघ (बुलढाणा),  श्रीगुरू डॉ. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर), ह.भ.प. संजयनाना महाराज धोंडगे (त्र्यंबकेश्वर), ओंकार महाराज सूर्यवंशी (कोल्हापूर), ह.भ.प. पोपट महाराज फरकाडे (संभाजीनगर) आणि प्रकटदिनी महंत नितीनदास महाराज आहिर (मलकापूर) यांची कीर्तने होतील.

रविवारी (ता. ८) श्रींचा मुख्य 'प्रकटदिन' असून त्या दिवशी सकाळी सहा ते दुपारी १२.३० या वेळेत श्री विद्याधर जोशी यांच्या उपस्थितीत श्री गजानन विजयग्रंथाचे अखंड पारायण पार पडेल. सप्ताहाची सांगता ९ फेब्रुवारीला उत्तम महाराज बडे (आळंदी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories