news
clock
सलग २० दिवसांच्या कौशल्यपूर्ण तपासातून खुनाची उकल, चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या पोलिसांची कामगिरी

सलग २० दिवसांच्या कौशल्यपूर्ण तपासातून खुनाची उकल, चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या पोलिसांची कामगिरी

सलग २० दिवसांच्या कौशल्यपूर्ण तपासातून खुनाची उकल, चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या पोलिसांची कामगिरी

पिंपरी, ता. ३ - चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे बिरदवडी गावात ११ जानेवारी २०२६ रोजी अनोळखी पुरुषाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सलग २० दिवस कौशल्याने तपास करुन या खूनाची उकल केली आहे. गुन्हयातील अज्ञात मयत व्यक्ती शोधून तीन आरोपींना अटक केली आहे. 

 चाकण उत्तर पोलिस स्टेशन अंर्तगत असलेल्या मौजे बिरदवडी गावचे स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत मोकळ्या जागेत ११ जानेवारी २०२६ रोजी अंदाचे २५ ते ३० वर्षाच्या युवकाचा अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने खून केला होता. ओळख पटू नये म्हणुन त्याचे चेहऱ्यावर दगडाने मारुन चेहरा छिन्न-विछीन्न केला होता. मृत युवकाच्या खिशातील मोबाईल, ओळखपत्र व इतर वस्तू अज्ञात आरोपी घेऊन गेले होते. या अज्ञात आरोपीविरोधात चाकण उत्तर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याची उकल करण्यासाठी चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने सलग २० दिवस तपास मोहिम राबवली. यामध्ये पोलिसांनी, परिसरातील सी.सी.टी. व्ही. फुटेज तपासले, परीसरातील लोकांना व कंपन्यातील कामगार अड्डे यांना मयताचे छायाचित्र दाखवले, इतर पोलीस ठाण्यांमधील हरवल्याच्या नोंदी तपासल्या,  मयताच्या छायाचित्राची भित्तीपत्रके परीसरात लावली, सोशल मिडीया व वृत्तपत्रद्वारे मयत व त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. खूनाच्या ठिकाणहून तपास पथकाला काही भौतिक पुरावे सापडले. त्यावरुन आरोपी याचा शोध घेतला तेव्हा मोपेड गाडीबाबत माहीती पोलिसांना मिळाली. हा धागा पकडून पुढे पोलिसांनी त्या गाडी  मालकाकडे चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र आरोपी निखील नानासाहेब चव्हाण (वय २१ वर्षे, रा. ता.खेड) यास ७ जानेवारीला गाडी वापरण्यास दिल्याचे सांगितले. 

त्यानंतर, आरोपी निखिलचा शोध पोलिसांनी घेतला व त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली.  विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, मयत मुंजा धोंडीबा नरहिरे (वय २५ वर्षे, रा. गंगाखेड जि. परभणी) याचे व निखिलची आई उषा नानासाहेब चव्हाण (वय ४० वर्षे, रा. गंगाखेड जि.परभणी) यांचे अनैतीक संबंध होते. मयत उषा यांना म्हणजे निखिलच्या आईला त्रास देत असल्याने निखिल, त्याचा मित्र स्वप्नील पारधी (वय १९ वर्षे, रा. ता. खेड) व उषा चव्हाण यांनी मुंजा याला ७ जानेवारीला चाकणला बोलावून घेतले. त्यानंतर मोटारसायकलवरुन आरोपी त्याला दारु पिण्याच्या निमित्ताने मौजे बिरदवडी गावात ओढ्यालगत निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले. तिथे निखिल व स्वप्नीलने कोयत्याने वार करुन मुंजाचा खून केल्याचे उघडकीस आले.

गुन्ह्याची उकल करण्याची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त परीमंडळ-३ मारुती जगताप, सहा. पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, सुनिल शिंदे, पोलिस हवालदार भैरोबा यादव, प्रितम ढमढेरे, योगेश कोळेकर, पोलिस शिपाई शिवाजी लोखंडे, महेश कोळी, शरद खैरनार, सुमित जगझाप यांनी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories