हातभट्टीची दारु बाळगल्याप्रकरणी युवतीवर गुन्हा
पिंपरी, ता. २ - विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु बाळगल्याप्रकरणी २६ वर्षीय युवतीस पोलिसांनी नोटीस बजावली आहे. वाकड पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २) तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेणूनगर-वाकड येथील गणपतीमंदिराच्या मागे आरोपी युवतीने ७,२००/- रुपयांची ७२ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगली होती. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट - २ कडून युवतीवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिला नोटिस बजावण्यात आली आहे.