news
clock
होळीविशेष कार्यक्रमात अपघात, लाईटचा गर्डर कोसळून १० हून अधिक जखमी

होळीविशेष कार्यक्रमात अपघात, लाईटचा गर्डर कोसळून १० हून अधिक जखमी

होळीविशेष कार्यक्रमात अपघात, लाईटचा गर्डर कोसळून १० हून अधिक जखमी 

पिंपरी, ता. ३ - होळीनिमित्त पुण्यातल्या कोरेगाव पार्क-मुंढवा रोड परिसरातील रॉयल फॉर्म येथे आयोजित 'कलर कल्चर' या होळी विशेष कार्यक्रमात मोठा अपघात घडला. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेला लाईटचा गर्डर अचानक कोसळल्याने दहाहून अधिक तरुण-तरुणी जखमी झाले आहे. सुमारे ११०० नागरीक कार्यक्रमाला उपस्थित होते. 

या कार्यक्रमावेळी  काही तरुण मद्यप्राशन करून लाईटच्या गर्डरवर चढल्याने तोल जाऊन संपूर्ण गर्डर खाली कोसळला. या घटनेत जखमी झालेल्यांपैकी तीन जणांना उपचारासाठी ससून रुग्णालयात आणि एकाला जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इतर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. अपघातानंतर कार्यक्रम काही काळ थांबवण्यात आला. या घटनेची चौकशी पोलिसांकडून  सुरु आहे. 










Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories