news
clock
सेवानिवृत्त होणारे अधिकारी-कर्मचारी कायम स्मरणात राहतील - उपमहापौर शर्मिला बाबर

सेवानिवृत्त होणारे अधिकारी-कर्मचारी कायम स्मरणात राहतील - उपमहापौर शर्मिला बाबर

 सेवानिवृत्त होणारे अधिकारी-कर्मचारी कायम स्मरणात राहतील - उपमहापौर शर्मिला बाबर 

पिंपरी, ता. ३ - ''महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे काम करुन अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्त होणारे हे महापालिकेतील सहकारी अधिकारी व कर्मचारी त्यांच्या जबाबदारीने काम करण्याच्या पध्दतीमुळे, सेवाभावी वृत्तीमुळे व त्यांच्या आठवणींमुळे कायम स्मरणात राहतील.'' असे  उद्गार उपमहापौर शर्मिला बाबर यांनी काढले. त्यांनी सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.

नियत वयोमानानुसार आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या महापालिकेतील २६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये, शहर अभियंता मकरंद निकम, साहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, कार्यालयीन अधीक्षक अनिता बाविस्कर, मनीष जगताप, लेखापाल तानाजी सावंत, उपशिक्षक बापूराव गिरमे, मुख्य लिपिक चांगदेव खुने, सिस्टर इन्चार्ज जयश्री दाभाडे, नर्स मिडवाईफ सुजाता धवन, प्लंबर दिलीप गायकवाड, वायरमन रमेश थोरात, वीजतंत्री ज्ञानेश्वर ताम्हाणे, मुकादम राजेश कोटरवार, शांताराम तळपे, शिपाई कैलास वाघेरे, जितेंद्र मोरे, रखवालदार दत्तात्रय घुले, मजूर बाळू काळभोर, बलभीम कांबळे, पोपट भांगरे, आया सुमन तांबे, सफाई कामगार नयना कामठे, अनिल टाक, सुनीता शिंदे, गणेश भंडारी, गटरकुली धोंडीबा गायकवाड यांचा समावेश आहे. 

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. उपआयुक्त संदीप खोत, सहशहर अभियंता सुनील भागवानी उपस्थित होते. मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी प्रास्ताविक केले. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories