news
clock
२ लाख ८२ हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

२ लाख ८२ हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक

२ लाख ८२ हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक 

पिंपरी, ता. २ - महिलांच्या गळ्यातील २ लाख ८२ हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) भंडारा डोंगर पायथ्याजवळ मौजे सुदवडी गावच्या हद्दीत घडली आहे. चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत, माया सुहास गुरव (वय ४५ वर्षे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारीला वत्सला संपत गायकवाड (वय ३५ वर्षे) व कस्तुराबाई भागवत लोखंडे (वय ४५ वर्षे) यांनी या दोघी भजनाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांची तोंडओळख असलेल्या माया व आणखी काही महिलांचे २ लाख ८२ हजार रुपयांचे दागिने त्यांनी लबाडीने चोरुन नेले. 

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories