३ लाख ७२ हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक 

पिंपरी, ता. २ -  महिलांच्या गळ्यातील ३ लाख ७२ हजार रुपयांचे दागिने  दोन महिलांनी चोरुन नेले आहेत.  ही घटना शनिवारी (ता. ३१) भंडारा डोंगर पायथ्याजवळ मौजे सुदवडी गावच्या हद्दीत घडली आहे. चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत, शांताबाई दत्तात्रय चव्हाण (वय ६६ वर्षे) (रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारीला आरोपी गौळण पांडुरंग गायकवाड (वय ४० वर्षे) व प्रिती अंबादास माहिते (वय ३२ वर्षे) या दोघी भजनाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांची तोंडओळख असलेल्या शांताबाईचे व इतर काही महिलांचे एकूण ३ लाख ७२ हजार रुपयांचे दागिने लबाडीने चोरुन नेले. 

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance