'नृत्यंजली'मध्ये  विद्यार्थिनींचे  भरतनाट्यम नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण 

पिंपरी, ता. ३ - नृत्यकला मंदिर आयोजित 'नृत्यंजली' कार्यक्रमात विद्यार्थिनींनी भरतनाट्यम नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. शनिवारी (ता. ३१) निगडीतील मनोहर वाढोकर सभागृहात कार्यक्रम उत्साहात पार पडला. 

भरतनाट्यमच्या सुप्रसिद्ध गुरु तेजश्री अडिगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा झाला. यावेळी मॉरिशस महाराष्ट्र मंडळ फेडरेशनचे अध्यक्ष बलराज नारू, सदस्य रवीन राव आणि मॉरिशस-भारत कल्चरलचे रिलेशन कमिशनर संदीप जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी मुकादम, नगरसेविका शैलजा मोरे, संस्थेचे विश्वस्त अविनाश अडिगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


'श्लोकम'ने कार्यक्रमाची सुरवात झाली, सात वर्षांच्या विद्यार्थिनींनी पुष्पांजली सादरीकरण करुन टाळ्यांची दाद मिळवली. पुढे, मोठ्या विद्यार्थिनींनी विविध 'अडवू'चे सादरीकरण केले. त्याचबरोबर अलारीपू, गणेश कीर्तन, सरस्वती कौतुकम, शिव आणि पार्वती यांच्यावरील अभिनय पद, तिल्लाना आणि मंगलम् अशा पारंपारिक भरतनाट्यमच्या नृत्य रचना सादर केल्या. माहेश्वरी जोशी, वीणा भोसले, हरिप्रिया चौधरी व विशेष कार्याबद्दल वैष्णवी शर्मा यांना विशेष कार्याबद्दल गौरवण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये मृदंगवर एच. वेंकटरमण, गायनाची साथ महती गुरुमूर्ती यांनी तर व्हायोलिनवर अजय चंद्रमौली यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन विद्या जोशी यांनी केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance