पिंपरी-चिंचवड
पुणे शहर / जिल्हा
देहू नगरपंचायतीला सुविधांच्या निर्मितासाठी २ हेक्टर जमीन
Feb 05 2026
76
देहू नगरपंचायतीला सुविधांच्या निर्मितासाठी २ हेक्टर जमीन
पिंपरी, ता. ५ - देहू नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत व अग्निशमन केंद्र या सार्वजनिक सुविधांसाठी देहू येथील सरकारी गायरानातील पाच एकर जागा देहू नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पत्र नगरपंचायतीला नुकतेच मिळाले आहे. नगरपंचायत प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
देहू नगरपंचायतीच्या इमारत बांधणीसाठी जागा आवश्यक होती. या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत प्रशासनाकडून जागा मिळावी यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार, शासनाने देहू नगरपंचायतीला दोन हेक्टर जागा इमारत व अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी दिली आहे. हा आदेश राज्याचे महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी मोहसीन शेख यांनी जारी केला आहे.