news
clock
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेला नोटिस

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेला नोटिस

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेला नोटिस 

पिंपरी, ता. ७ - वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने वडमुखवाडी-दिघी येथे सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यामहिलेला सोमवारी (ता. ७) नोटिस बजावली आहे आणि तिच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात  या प्रकरणी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथे एक महिला रस्त्यावर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करत होती. लैंगिक हावभाव, अश्लील शब्दोच्चार करत होती. त्यामुळे तेथून वावरणाऱ्या नागरीकांना अडथळा होत होता आणि सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत होता. 

पोलिसांनी या महिलेला भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चेकलम ३५ (३) प्रमाणे नोटिस बजावली आहे. तिच्याविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories