मनाई आदेशाचे उल्लंघन करुन पिस्तूल बाळगणारे १९ वर्षीय दोन युवक अटकेत
पिंपरी, ता. १६ - जिंवत काडतुसांसह देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन युवकांना जुनी सांगवी येथून बुधवारी (ता. १५) अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तरुणांवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी साहिल दत्तात्रय साष्टे (वय १९ वर्षे, रा. मयुर कॉलनी कोथरुड) व साई विठ्ठल वाशिवले (वय १९ वर्षे, रा. कोथरुड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आहे. दोघा आरोपींनी या आदेशाचे उल्लंघन करुन रुपये १,००,०००/- किंमतीची देशी बनावटीची २ पिस्तुले, ४०००/- रुपयांची ४ जिवंत काडतुसे बाळगली होती. पिस्तूल व काडतुसांसह ५०,०००/- रुपयांची होंडा अॅक्टीव्हा असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपींविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात , भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), बी.एन.एस. कलम ३(५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३७(१) (३) सह १३५