news
clock
पुणे जिल्ह्यात  २० ते २७ एप्रिल या कालावधीत पाच ठिकाणी  रोजगार मेळावे,  पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून आयोजन

पुणे जिल्ह्यात २० ते २७ एप्रिल या कालावधीत पाच ठिकाणी रोजगार मेळावे, पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून आयोजन

पुणे जिल्ह्यात  २० ते २७ एप्रिल या कालावधीत पाच ठिकाणी  रोजगार मेळावे,  पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून आयोजन

पुणे, ता. १८ - पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने २० ते २७ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागांत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालयांतील प्रशिक्षणार्थीसह सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सुशिक्षित तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या ठिकाणी हे मेळावे आयोजित केले आहेत. यामध्ये, सोमवारी (ता. २०) वरवंड, मंगळवारी (ता. २१)  इंदापूर, बुधवारी (ता. २२)  औंध, गुरुवार (ता. २३)  राजगुरुनगर आणि सोमवारी (ता. २७)  शिरूर येथील शासकीय आयटीआयमध्ये मुलाखती होतील. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवीधर व पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांसाठी विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या मेळाव्यांत फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, युनो मिंडा आणि अॅडको इंडिया यांसारख्या नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

 इच्छुक उमेदवारांनी नोंदणीसाठी 'www.rojgar.mahaswayam.gov.in'या अधिकृत संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी. मुलाखतीसाठी येताना शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती आणि किमान पाच बायोडाटा सोबत आणावा. अधिक माहितीसाठी पुण्यातील रास्ता पेठ येथील कार्यालयाशी किंवा दूरध्वनी क्रमांक (०२०) २६१३३६०६ वर संपर्क साधावा, अशा सूचना  पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने दिल्या आहेत. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories