माजी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील विकासकामे, निविदा प्रक्रिया, देयकांची सखोल चौकशी करावी, - नगरसेवक विनोद नढे यांची मागणी, महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
Apr 18 2026
46
माजी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या कार्यकाळातील विकासकामे, निविदा प्रक्रिया, देयकांची सखोल चौकशी करावी
- नगरसेवक विनोद नढे यांची मागणी, महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
पिंपरी, ता. १८ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी शहर अभियंता मकरंद निकम यांनी काही महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृती घेतली. त्यांच्या कार्यकाळातील सर्व विकासकामे, निविदा प्रक्रिया आणि देयकांची सखोल चौकशी करावी अशी मागणी नगरसेवक विनोद नढे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. तसेच निकम यांच्या कार्यकाळातील सर्व निविदा प्रक्रियेची माहिती उपलब्ध करुन द्यावी, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले आहे. सदर माहिती उपलब्ध करुन न दिल्यास किंवा त्यात अनियमितता आढळल्यास, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा विनोद नढे यांनी दिला आहे.
याबाबत, विनोद नढे यांनी महापालिका आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मकरंद निकम यांनी शहर अभियंता या पदावर कार्यरत असताना घेतलेले अनेक तांत्रिक निर्णय आणि राबवलेल्या निविदा प्रक्रिया संशयास्पद वाटत आहेत. सार्वजनिक निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाला आहे की नाही, याची खात्री करणे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृती घेतली असली, तरी महाराष्ट्र नागरी सेवा (पेंशन) नियम, १९८२ नुसार त्यांच्या कार्यकाळातील अनियमिततेची चौकशी करण्याचा अधिकार प्रशासनास आहे. त्याअनुषंगाने, खालील कामांची सविस्तर माहिती व कागदपत्रे मला १५ दिवसांच्या आत उपलब्ध करुन द्यावीत.
त्यात १. निविदा प्रक्रिया - निकम यांच्या कार्यकाळात शहर अभियंता म्हणून मंजूर करण्यात आलेल्या सर्व लहान-मोठ्या निविदांची यादी, त्यातील अटी-शर्ती आणि मंजूर दर, २. देयके - संबंधित कामांसाठी कंत्राटदारांना अदा करण्यात आलेल्या रक्कमेचा तपशील 3. थर्ड पार्टी ऑडिट - त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट झाले असल्यास त्याचे अहवाल, ४. विशेष अधिकार - त्यांनी त्यांच्या स्तरावर ‘आणीबाणीच्या कामां’च्या नावाखालीकोणत्याही निविदेविना मंजूर केलेल्या कामांचा तपशील, ५. तांत्रिक मंजुरी -रस्ते, उड्डाणपूल आणि पाणीपुरवठा विभागांतर्गत ज्या कामांना त्यांनी तांत्रिक मंजुरी दिली, त्या कामांची सद्यस्थिती....या कागपत्रांचा समावेश आहे.
- निविदा प्रक्रिया, Tender Process, देयके तपशील, Payment Details, अनियमितता, Irregularities, थर्ड पार्टी ऑडिट, Third Party Audit,
- चौकशी मागणी, Inquiry Demand
- शहर अभियंता, City Engineer, स्वेच्छानिवृत्ती, Voluntary Retirement (VRS)
- मकरंद निकम, Makarand Nikam, विनोद नढे, Vinod Nadhe,
- पिंपरी चिंचवड महापालिका, Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)