news
clock
डुडुळगाव येथील ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के, शाळेकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

डुडुळगाव येथील ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के, शाळेकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

डुडुळगाव येथील ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के, शाळेकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

पिंपरी, ता. १६ - डुडूळगाव येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा इयत्ता दहावीचा (सीबीएसई) निकाल यंदा १००% लागला आहे. शाळेची इयत्ता 10 वी ची ही पहिली बॅच आहे. शाळेच्या प्राचार्या डॉ. उर्मिला जाधव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

डॉ. जाधव म्हणाल्या, ''मयुरी मस्करे (91.2%),कु.श्रेया खोत (91%) कु. हर्षिता सूर्यवंशी (91%), कु.श्रद्धा सोळंकी (91.2%), साई सतीश पाटील (90.2%), लुकेश निलेश नेहेते (90%) विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळवले आहे. शाळेतील एकूण 71 विद्यार्थ्यांपैकी 56 विद्यार्थ्यांना वैयक्तिक विषयांमध्ये 90 पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले याचा शाळेला अभिमान आहे.'' 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, सचिव सुधीर मुंगसे, कोषाध्यक्ष अजित गव्हाणे तसेच विश्वस्त विक्रांत लांडे व किरण चौधरी, प्रमोद बोचरे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. प्राचार्या डॉ. उर्मिला जाधव, समन्वयिका  कल्याणी केऱ्हाळकर, अमृता विळसकर व सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व अध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शंभर टक्के निकालामुळे डुडूळगाव परिसरात शाळेचे कौतुक होत आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories