भरधाव टेम्पोची धडक बसून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू, बर्ड व्हॅलीसमोर अपघात
Apr 07 2026
25
भरधाव टेम्पोची धडक बसून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू, बर्ड व्हॅलीसमोर अपघात
पिंपरी, ता. ७ - भरधाव टेम्पोची धडक बसून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात एमआयडीसी चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानासमोर सोमवारी (ता. ६) घडला आहे. सुभाष बन्सी ओव्हाळ (वय ४२ वर्षे) असे मृत इसमाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत, सुभाष ओव्हाळ यांचा मुलगा अजय ओव्हाळ याने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टेम्पोचालक संतोष सुभाष दळगडे (वय ४५ वर्षे, चिखली) याला अटक केली आहे. सुभाष बन्सी ओव्हाळ मोटारसायकलवरुन थरमॅक्स चौकातून ते बर्ड व्हॅली चौकाकडे जात असताना बर्ड व्हॅलीसमोर पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली. ते खाली पडले व तोच टेम्पो त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला.
आरोपी टेम्पोचालकावर निगडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (ब), मोटार वाहन अधिनियम मलम्म १८४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.