news
clock

'युपीएससी'तर्फे घेण्यात आलेल्या  नागरी सेवा परीक्षेत  ९५८ उमेदवार यशस्वी

महाराष्ट्रातील ६० हून अधिक विद्यार्थ्यांची यशाला गवसणी 

पुणे, ता. ७  - केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-२०२५ चा निकाल शुक्रवारी (ता. ६) जाहीर झाला. या परीक्षेत एकूण ९५८ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील राज्यातील ६० हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे. अनुज अग्निहोत्री हा देशात पहिला आला आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवेची लेखी परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये आणि मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडल्या. या दोन्ही टप्प्यांच्या आधारे आयोगाने एकूण ९५८ उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सर्वसामान्य गटातून ३१७, आर्थिक मागासवर्ग प्रवर्गातून १०४, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून - ३०६, अनुसूचित जाती प्रवर्गातून - १५८, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ७३ उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने २५८ उमेदवारांची आरक्षित सूची जारी केली आहे. त्यात सामान्य गट १२९, आर्थिक मागास प्रवर्ग २६, इतर मागास वर्ग - ८६, अनुसूचित जाती - ८, अनुसूचित जमाती ६, तर तीन दिव्यांगांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांची नावे -

हृषीकेश आलासे (६१) आकाश त्रिवेदी (७३) गौरव चोप्रा (८३) सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेव ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुष पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंश् (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाक (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१)


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories