news
clock
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच पहिलीत प्रवेश मिळणार

३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच पहिलीत प्रवेश मिळणार

 ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच पहिलीत प्रवेश मिळणार 

पुणे, ता. ७ - महाराष्ट्र सरकारने नवीन शिक्षण धोरणांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पहिलीच्या प्रवेश नियमांमध्ये बदल केले आहेत. या शैक्षणिक वर्षापासून  ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच  पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. सदर नियमांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे की, पूर्वी प्रवेशाची वयोमर्यादा ३१ मार्च होती, परंतु आता ती ३१ डिसेंबर आहे. शिक्षण विभागाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. या संदर्भात संबंधित शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळांसाठी समान नियम लागू करण्यात आले आहेत. प्रवेशासाठी मुलाचा जन्म प्रमाणपत्र हा वयाचा एकमेव पुरावा असेल. 

योग्य वयात शिक्षण सुरु झाल्यास मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास चांगला होतो आणि ते बालपणातील आनंद देखील अनुभवू शकतात, असे शिक्षकांचे मत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories