पुणे शहर / जिल्हा
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुक येथे जाण्यासाठी 'पीएमपी'कडून जादा गाड्या
Mar 16 2026
54
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुक येथे जाण्यासाठी 'पीएमपी'कडून जादा गाड्या
पुणे, ता. १६ - छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुक येथे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी असंख्य नागरीक येत असतात. महाराजांच्या अनुयायांच्या सोयीसाठी १८ मार्चला वढू बुद्रुकला जाण्यासाठी पुणे महानगर जादा बसेसचे नियोजन केले आहे.
या एकूण १४ जादा गाड्या पुणे मनपा भवन, स्वारगेट, हडपसर, भोसरी, निगडी या मुख्य ५ बसस्थानकांहून सुटणार आहेत. साधारणपणे दीड तासाच्या अंतराने या गाड्या उपलब्ध असतील. प्रवाशांनी या जादा बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन 'पीएमपी'कडून करण्यात आले आहे.