news
clock

 श्री डोळसनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त १९ ते २५ मार्चपर्यंत तळेगावातील वाहतुकीत बदल

पिंपरी, ता. १६ -  तळेगाव परिसरात १९ ते २५ मार्च या कालावधीत श्री डोळसनाथ महाराज यात्रा उत्सव पार पडणार आहे. या उत्सवासाठी श्री डोळसनाथ महाराज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात.  भाविकांना कोणताही त्रास अथवा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता परिसरातील वाहतुकीत उत्सव कालावधीत बदल करण्यात येत आहे.  त्याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहेत. 

सर्व वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. 


तळेगाव वाहतूक विभागांतर्गत वाहतूकीत उत्सव कालावधीत खालील बदल असतील.....


- जिजामाता चौकाकडुन डोळसनाथ मंदिराकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

  पर्यायी मार्ग :- मारुती मंदिर चौक जुनीनगर परिषद इमारती समोरुन संभाजी नगर नालबंद गल्ली गणपती चौक मार्गे पुढे इच्छित स्थळी. 


- सुभाष चौकाकडुन डोळसनाथ मंदिराकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत    आहे.

  पर्यायी मार्ग :- मारुती मंदिर चौक जुनीनगर परिषद इमारती समोरुन संभाजी नगर गणपती चौक मार्गे   इच्छित स्थळी जातील.


- घोरवाडी रेल्वे स्टेशनकडुन जिजामाता चौक व डोळसनाथ महाराज मंदिराकडे जाण्यास गणपती चौकात बंदी करण्यात येत आहे.

   पर्यायी मार्ग :- गणपती चौक (डावीकडे वळून)  नालबंद गल्ली संभाजी नगर जुनीनगर परिषद इमारती समोरुन मारुती मंदिर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories