news
clock
'सलग १८ तास अभ्यास' अभियानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले जाणार अभिवादन

'सलग १८ तास अभ्यास' अभियानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले जाणार अभिवादन

'सलग १८ तास अभ्यास' अभियानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले जाणार अभिवादन 

पिंपरी, ता. ६ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने दापोडीमध्ये 'सलग १८ तास अभ्यास अभियान' राबविण्यात येणार आहे. त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहायक गण संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा व अभ्यास केंद्राच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. यंदा उपक्रमाचे २१ वे वर्ष आहे.

सलग १८ तास अभियानाची सुरवात सकाळी १३ एप्रिलला सकाळी ६ वाजल्या पासून होईल. रात्री १२ वाजेपर्यंत हे अभियान सुरु राहील. दापोडी येथे डॉ. आंबेडकर पुतळ्याशेजारील त्रिरत्न लॉन येथे हे अभियान पार पडेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि वाचनप्रेमी या अभियानात सहभागी होणार आहेत. 

शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वृद्धींगत व्हावी आणि ध्येय साध्य करण्याची त्यांची  जिद्द वाढीस लागावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे, असे प्रकल्प समन्वयक निखिल आखाडे यांनी सांगितले.  




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories