औंधमधील श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेहमेळावा
औंधमधील श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेहमेळावा
पिंपरी, ता. ६ - जनता शिक्षण संस्था संचालित औंध येथील श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावीच्या सन 2002-2003 च्या माजी विद्यार्थ्यांचा आणि बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा येत्या रविवारी (ता. १२) आयोजित केला आहे. विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत हा मेळावा पार पडणार आहे. माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात स्वागत समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षकांचा सन्मान आणि माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन होणार आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा मेळावा जुन्या आठवणींचा व शाळेशी असलेल्या भावनिक नात्याचा उत्सव आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.