पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष - उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष - उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष - उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे

दोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच

पिंपरी, ता. १० जुलै २०२६ - संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराज महाराज पालखीच्या पार्श्वभूमीवर गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांकरिता पुणे जिल्ह्यात एकूण ५७ हिरकणी कक्ष उभारण्यात आले असून याकरिता ७ बालविकास प्रकल्प अधिकारी, ५७ अंगणवाडी पर्यवेक्षिका, १९८ गणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली.

या हिरकणीकक्षाअंतर्गत २ वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरामध्ये राजगिरा, शेंगदाणा, मुरमुऱ्याचे लाडु, फुटाणे, फळे, बिस्किट, ओरआरएस, ग्लुकॉन डी, खाऊ ठेवण्यासाठी बरण्या, कागदी डिश आदी, खेळणी संचामध्ये बॅट बॉल. खुळखुळा. बाहुली. मोठा बॉल व लहान मुलांची इतर आवश्यक खेळणी आदी, गरोदर व स्तनदा मातांना अल्हाददायी वातावरणासाठी बेड, गाद्या, बेडशीट, उश्या-उशीचे कव्हर, पार्टिशनसाठी मोठे पडदे आणि नॅपकीन, प्रथमोपचार पेटी, पिण्याच्या पाण्याचे जार व ग्लास व सॅनेटरी पॅड या सुविधा आहेत.

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांना हिरकणी कक्षांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंडागळे यांनी केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories