सुमारे ८१ लाख नोंदणीकृत लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळले, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती
सुमारे ८१ लाख नोंदणीकृत लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळले, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती
पिंपरी, ता. १४ जुलै २०२६ - राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेमध्ये ई-केवायसी' पडताळणीनंतर सुमारे ८१ लाख नोंदणीकृत लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी (ता. १३) दिली.
आदिती तटकरे यांनी सांगितले की, अपात्र नोंदणी, प्राप्तिकर भरणारे आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय यांना योजनेतून वगळण्यासाठी 'ई-केवायसी' प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. सदर योजना सुरू झाली तेव्हा २.६३ कोटी महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन कोटी ४७ लाख महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाला. मात्र, 'ई-केवायसी'नंतर ही संख्या कमी झाली आहे. सुमारे ६२ लाख महिलांनी वारंवार मुदतवाढ देऊनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. १६ लाख लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आढळले, तर ४.४२ लाख लाभार्थी शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याने अपात्र ठरले. काही पुरुष आणि शासकीय कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडून वसुली सुरू करण्यात आली आहे.
- लाभार्थी महिला, Women Beneficiaries, लाभार्थी पडताळणी, Beneficiary Verification, अपात्र लाभार्थी, Ineligible Beneficiaries, योजना लाभार्थी, Scheme Beneficiaries, नोंदणीकृत लाभार्थी, Registered Beneficiaries, राज्य सरकार, Maharashtra Government
- महिला व बालविकास मंत्री, Women and Child Development Minister, अदिती तटकरे, Aditi Tatkare, ई-केवायसी, e-KYC, eKYC Verification
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana