आळंदी-चाकण रस्त्यावर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल
आळंदी-चाकण रस्त्यावर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ४ – दिघी पोलिसांनी आळंदी-चाकण रोडवरील योगीराज लॉज समोर सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलांवर कारवाई केली. ही कारवाई ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
संबंधित महिलांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ (PITA Act) कलम ८ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई कृष्णा उत्तम कराड (वय ३५) व सुभाष ज्ञानेश्वर पाटील (वय ५५ वर्षे) यांनी तक्रार दाखल केली.
आरोपी महिला अश्लील हावभाव करून आणि अश्लील शब्द उच्चारून, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करत होत्या. त्यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग होत होता.
आरोपी महिलांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम ३५(३) अंतर्गत नोटिस बजावण्यात आली आहे.