बावधन परिसरात सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ४ - बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत, पोलिसांनी फिर्याद दाखल केल्या आहेत. या महिला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व शब्दांचा वापर करून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करत असल्याचे आढळले. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत होता.
या प्रकरणी या महिलांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे -
1) बावधन परिसरात ग्रीन पार्क लॉजजवळ कारवाई; एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्रीन पार्क लॉजजवळ सर्व्हिस रोडवर सार्वजनिक ठिकाणी अनैतिक वर्तन केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २.१९ वाजता संबंधित महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व शब्दांचा वापर करून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करत असल्याचे आढळले. या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
2) बेंगलोर मुंबई हाय वे सर्व्हिस रस्त्यावर महिलेचे गैरवर्तन कारवाई; अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद
बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत समीर ऑटो गॅरेजजवळ, मुंबई-बेंगलोर हायवे सर्व्हिस रोडवर एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ३ जून २०२६ रोजी दुपारी ४.३४ वाजता घडली असून, संबंधित महिलेने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून वर्तन केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास व सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग झाला.
या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ नुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
3) भुगाव रोडवरील अॅब्रोसिया हॉटेलजवळ गुन्हा; एका महिलेविरुद्ध नोंद
भुगाव रोडवरील अॅब्रोसिया हॉटेल परिसरात सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन केल्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ३ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २.०० वाजता संबंधित महिलेने वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने अश्लील हावभाव व शब्दांचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.