माऊलींच्या मंदिरातील चोरीच्या घटनेनंतर आळंदी देवस्थानकडून मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाचे बदल

माऊलींच्या मंदिरातील चोरीच्या घटनेनंतर आळंदी देवस्थानकडून मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाचे बदल

माऊलींच्या मंदिरातील चोरीच्या घटनेनंतर आळंदी देवस्थानकडून मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाचे बदल

पिंपरी, ता. २७ - आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात सेवकानेच चोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यानंतर, देवस्थानने सुरक्षाव्यवस्थेत व आर्थिक नियंत्रण व्यवस्थेत महत्वाचे बदल केले आहेत. याबाबतची माहिती मंगळवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत देण्यात आली. आता देवस्थानच्या अन्नदान आणि कॅश मोजणी विभागात कोणताही स्वयंसेवक नियुक्त केला जाणार नाही. मुख्य व्यवस्थापकांच्या उपस्थितीतच दानपेट्या उघडल्या जातील. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्यात येईल आणि अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली रक्कम मोजली जाणार आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची झडती घेण्यात येणार आहे. 

आळंदी येथील भक्त निवासात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप,  प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, तसेच ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून डि.डि. भोसले, नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, रामभाऊ भोसले, संजय घुंडरे आणि नगरसेवक सचिन गिलबिले उपस्थित होते.

अॅड. उमाप यांनी सांगितले की, ''संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात सेवकाने दानपेटीतील पैशांची चोरीची घटना दुर्दैवी आहे. याबाबत, देवस्थानच्या व्यवस्थापकासह अन्य तीन कर्मचाऱ्यांकडून चोरीच्या घटनेबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या आरोपींना पाठीशी घातले जाणार नाही. यापुढे, मंदिरातील सर्व कर्मचारी, स्वच्छता सेवक आणि सुरक्षा रक्षकांसाठी गणवेश ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश आणि बाहेर पडताना सुरक्षा तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे, कर्मचाऱ्यांनी बरोबर येताना कोणत्याही प्रकारची पिशवी सोबत आणू नये तसेच बाहेर पडताना घेऊन जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे व याबाबत तपासणी केली जाणार आहे. दानपेटीतील रक्कमचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. मंदिर प्रशासन अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक ईआरपी सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मंदिरातील कर्मचारी सेवेकरी यांच्या हजेरी जिओ ट्रेकिंग आणि हालचाली टिपण्यासाठी सॉफ्टवेअर बसवले जाणार आहे. त्यांची  बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेतली जाईल. देवस्थानचे विश्वस्त मंडळातील किमान एक विश्वस्त दररोज भेट देऊन व्यवस्थापनावर देखरेख ठेवतील. कॅश विभागात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे भविष्यात एआय तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories