news
clock
होळीसाठी झाडांच्या फांद्या तोडल्यास दंडात्मक कारवाई होणार

होळीसाठी झाडांच्या फांद्या तोडल्यास दंडात्मक कारवाई होणार

होळीसाठी झाडांच्या फांद्या तोडल्यास दंडात्मक कारवाई होणार

पिंपरी, ता. २८ - होळीचा सण २ मार्चला साजरा होणार आहे. होळी पेटवण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. त्यामुळे, होळीसाठी झाडे तोडल्यास पुणे महापालिकेने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे, जाळणे किंवा नुकसान करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन कायदा २०२१ अंतर्गत, परवानगीशिवाय झाड तोडल्यास संबंधित झाडाच्या किंमती एवढा म्हणजे जास्तीत जास्त १ लाखांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पुणे महापालिका प्रशासनाने महापालिका प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बेकायदेशीर वृक्षतोड किंवा फांद्या तोडल्याची तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी झाडे न तोडता पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories