प्रवासी ऑटोरिक्षांमधून अनधिकृत मालवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

प्रवासी ऑटोरिक्षांमधून अनधिकृत मालवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

प्रवासी ऑटोरिक्षांमधून अनधिकृत मालवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार 

पिंपरी, ता. १८ जुलै २०२६ - प्रवासी ऑटोरिक्षांमधून अनधिकृत मालवाहतूक करू नये; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय

प्रवासी परवानाधारक ऑटोरिक्षांचा मालवाहतुकीसाठी वापर करू नये, तसेच अशा वाहनांचे पोर्टर (Porter) किंवा तत्सम ॲप्सवर ऑनबोर्डिंग करू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

प्रवासी परवानाधारक ऑटोरिक्षा मालवाहतुकीसाठी वापरल्या जात असल्याचे अथवा त्या पोर्टर किंवा तत्सम ॲप्सवर नोंदणीकृत असल्याचे आढळल्यास संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायदा, १९८८ तसेच त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories